[ad_1]
पोलिस वडिलांकडून आपल्या पोटच्या मुलीवर वर्षभर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची किळसवाणी घटना अमरावतीत घडली आहे. या घटनेमुळे बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला आहे.
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. अत्याचार करणारा नराधम बाप हा पोलिस दलात कार्यरत आहे. पीडित तरुणी 24 वर्षांची आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, विनयभंग व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या माहितीनुसार, आरोपीने गत 4 जून रोजी सकाळी 7 वा. तिच्या अंगाला घाणेरडा स्पर्श केला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू होता. अखेर वारंवार होणारा त्रास असह्य झाल्यामुळे पीडित तरुणीने राजापेठ पोलिस ठाणे गाठून पोलिसांपुढे आपबिती कथन केली.
पीडिता 8 वीत असल्यापासून सुरू होता अत्याचार
गंभीर गोष्ट म्हणजे पीडित तरुणी 2015 मध्ये इयत्ता आठवीत होती. त्यावेळी आरोपीने पहिल्यांदा तिच्याशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांनी आईला बाहेरगावी पाठवून आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती पीडितेने आपल्या आईला सांगितली. पण आरोपीने या दोघींनाही झाल्या प्रकाराची बाहेर वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जिवाच्या भितीने या दोघींनी ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. पण अखेर पीडितेने हिंमत दाखवून आपल्या आरोपी बापाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
या घटनेची माहिती बाहेर पडताच नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरूवात केली आहे.
पुण्यात 37 वर्षीय महिलेशी जबरीचे संबंध
दुसरीकडे, पुण्यातील एका प्रकरणात एका 40 वर्षीय व्यक्तीने 37 वर्षीय विवाहितेला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने विवाहितेचे नको ते फोटो व व्हिडिओ काढल्याचाही आरोप आहे.
हे ही वाचा…
राज्यातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द:फडणवीस सरकारचा धाडसी निर्णय; योजनांची अंमलबजावणी 3 वर्षांपासून रखडली होती
मुंबई – राज्याच्या तिजोरीवर माझी लाडकी बहीण योजनेचा ताण पडत असल्याच्या बातम्या चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभरातील 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या योजनांची मागील 3 वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी, सरकारने या योजनाच गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर
[ad_2]