नांदेड – विघानिकेतन प्राथमिक शाळा हडको येथील मुख्याध्यापक ३७ वर्ष सेवा केल्या नंतर नियमित वयोमानानुसार ३० जुनं रोजी सेवानिवृत्त होत असुन सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे .
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हडको येथील २०/८/१९८० रोजी विघानिकेतन प्राथमिक शाळेत बालाजी मटकमवाड हे रूजू झाले होते त्यांनी, ३५ वर्ष सहशिक्षक व दोन वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली ,सेवा काळात गणीत विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असतांनाच सिडको वसाहातील शालेय कर्मचारी पतसंस्थेच्ये अध्यक्ष म्हणून तिनं वेळेस बिनविरोध अध्यक्ष म्हणून कार्यभार संभाळला होता. ते ३० जुनं रोजी सेवानिवृत्ती होत असल्यामुळे शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.