कोपरगावच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले पाहिजे – आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :-  के.बी.पी. विद्यालयाच्या मैदानावर पार पडणाऱ्या ‘डे नाईट’ क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आलेली तयारी पाहता मोठ्या शहरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होत असल्याचे जाणवत आहे. क्रिकेटमध्ये करिअर करून इच्छिणाऱ्या तरुणाईने अशा स्पर्धांचा,सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून अशा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.  
           कोपरगाव येथील के.बी.पी. विद्यालय मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात ‘कोपरगाव प्रीमिअर लीग’ आमदार चषक २०२३ ‘डे नाईट’ क्रिकेट स्पर्धेचे आ. आशुतोष काळे यांनी उदघाटन करून स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली.
    आ. आशुतोष काळे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी रणजी, आयपीएल या स्पर्धांमध्ये निवड होण्यासाठी खेळाडूंनी मैदानावर घाम गाळला पाहिजे. फक्त स्पर्धा असल्यानंतरच मैदानावर येणे उपयोगाचे नसून त्यासाठी खेळात सातत्य महत्वाचे असून कष्ट सोसण्याची तयारी आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर स्पर्धा हि असतेच त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत आपण अव्वल राहू यासाठी प्रयत्न करून अशा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडल्यास या स्पर्धांचा उद्देश सफल होईल असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जावेद शेख, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, इम्तियाज अत्तार, ऋषिकेश खैरनार, आकाश डागा, निलेश डांगे, संदीप देवळालीकर, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, रहेमान कुरेशी, अमोल गिरमे, नितीन साबळे, सलीम पठाण, रितेश राऊत, विकि जोशी, चंद्रकांत धोत्रे, कैलास मंजुळ, मनोज कपोते, फिरोज पठाण, सोमनाथ गायकवाड, संजय नळे, रोहित खडांगळे, आशुतोष देशमुख, साईनाथ वाघ, सादिक पेंटर, हमीनशेख, अमीर पठाण, स्पर्धेचे आयोजक राजेंद्र जोशी, दादा पोटे, हाफीज शेख, रोशन शेजवळ, दिलीप पोटे, आण्णा मासाळ, हिरामण पोटे, नंदू चव्हाण, किरण पवार, अमोल वाघडकर, सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here