कोल्हे कारखाना व टाकळीकडे जाणारा रस्ता कुणी केला याची विवेक शुन्यांनी माहिती घ्यावी?- अॅड.राहुल रोहमारे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- आ. आशुतोष काळे Ashutosh Kale यांनी मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना सर्वच रस्त्यांचा विकास केला आहे. मात्र ज्यांच्याकडे विकास करायची व विकास पहायची दृष्टी नाही त्यांना विकास कधीच दिसणार नाही. त्यामुळे आपल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे Sahkar Maharshi sugar factory कारखाना व टाकळीकडे जाणारा रस्ता कुणी केला? याची विवेक शुन्यांनी माहिती घ्यावी अशी खरमरीत टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. राहुल रोहमारे यांनी विरोधकांवर त्यांच्याच शब्दात केली आहे.

विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना अॅड. राहुल रोहमारे यांनी विरोधकांवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे. ते म्हणाले की, कोपरगाव मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ.आशुतोष काळे यांनी सर्वच रस्त्यांना न्याय देवून मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी तब्बल ४६५ कोटी निधी दिला आहे. या निधीतून मतदार संघातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून मागील चार महिने पावसाळा असल्यामुळे कामे बंद होती. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करतात का? याची पण विवेक शुन्यांना माहिती आहे कि नाही? असा प्रश्न त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थित होत असला तरी त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेणे गरजेचे नाही. कारण मतदार संघाचा विकास झाला व जनतेपर्यंत पोहोचला देखील आहे. हे नुकतेच १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुजाण मतदारांनी काळे गटाला सर्वाधिक ग्रामपंचायतीची सत्ता देवून सिद्ध झाले आहे. त्यामुळे जनता देखील त्यांना गांभीर्याने घेत नाही.

पावसाळा आटोपत आल्यामुळे येत्या काही दिवसात उर्वरित रस्त्यांची कामे सुरु होणार आहेत.त्यामुळे तुम्हाला कुठेही रस्ता रोको करायची व तुम्हीच केलेल्या खड्यात तुम्हाला बसायची वेळ येणार नाही. थोडा धीर धरा, येत्या काही महिन्यात तुम्हाला उर्वरित सर्व रस्त्यांची कामे झालेली दिसतील, मात्र त्यासाठी तुमच्याकडे विकासाची दृष्टी देखील महत्वाची असून  कोणतेही योगदान नसताना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी निधी व विकासकामांवर विवेक शुन्यांनी बोलू नये. निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना पाणी मिळावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी स्वत: उभे राहून पाझर तलाव भरून घेतले हे या गावातील नागरिकानी पाहिले आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापुढे आ.आशुतोष काळे यांनी प्रखर भूमिका मांडली त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना अतिरिक्त दीड टीएमसी पाणी मिळाले आहे. यामध्ये तुमचे कोणतेही योगदान नसून तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही. त्यामुळे स्टंटबाजी करून लोकांना वेड्यात काढू नका व आपले रस्ते ज्यांनी केले आहे त्यांच्यावर टीका करून आपला बालीशपणा उघड करू नका असा उपरोधिक सल्ला अॅड. राहुल रोहमारे यांनी विरोधकांना दिला आहे.

विवेक शुन्यांनी न बोललेच बरे—-

चौकट :- २००४ पूर्वी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कुणी बंद पाडली व २००४ नंतर २०१४ पर्यंत हि योजना फक्त सुरुच केली नाही तर २०१४ पर्यंत कार्यान्वित ठेवली व पुन्हा २०१४ नंतर २०१९ पर्यंत या योजनेकडे कोणी दुर्लक्ष केले व न परवडणारी योजना म्हणून या पाणीपुरवठा योजनेवर शिक्कामोर्तब कुणी केले व हि परंपरा पुढे कुणी सुरु ठेवली?

 दिलेला शब्द पूर्ण करून २०१९ नंतर हि योजना पुन्हा कोणी सुरु केली? हे रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयेगाव, मनेगाव, अंजनापूर, बहादरपूर आदी गावातील व परिसरातील नागरिकांना चांगले माहित आहे त्यामुळे याबाबत विवेक शुन्यांनी न बोललेच बरे. – अॅड. राहुल रोहमारे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here