गुन्हे दाखल झाले तरी आहिल्याबाई होळकर जयंतीचे सर्व कार्यक्रम होणारच आ. रोहित पवार

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – मागील वर्षी या भागाचा आमदार म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य असा कार्यक्रम घेतला होता. मात्र यावेळी सरकार बदलल्याने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास आम्हाला प्रशासनाच्या वतीने परवानगी नाकारण्यात आली असली तरी दि. ३१ मे रोजी जयंतीनिमित्त गावकरी, ग्रामपंचायत व आहिल्याबाई होळकरांचे वंशज अक्षय शिंदे यांच्या वतीने काढण्यात येणारी यात्रा निघेल व मी त्या यात्रे सहभाग घेणार आहे. ही यात्रा सकाळी ७:०० सात वाजता निघणार आहे.

या यात्रेत आहिल्याबाई होळकर यांची कार्यभुमी असलेल्या उज्जेन येथून आणलेला (गजराज) हत्ती, घोडे, वारकरी, टाळकरी भावीक यांचा समावेश असलेली यात्रा ही निघणारच जरी परवानगी दिली नाही, किंवा गुन्हे दाखल केले तरी यात्रा काढण्यात निर्धार ग्रामस्थ, वंशज व आ. रोहित पवार यांनी केले आहे. याबरोबरच आज संध्याकाळ पर्यंत प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी आ. पवार यांनी केली आहे. 

     चोंडी ग्रामपंचायत, आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे व आ. रोहित पवार यांच्या यांच्या माध्यमातून दि. ३१ मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रमांना प्रशासनाने परवानगी नाकारली असून या बाबत आपली भूमिका मांडण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या वतीने चोंडी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिती विविध माध्यमांच्या प्रतिनधींशी बोलताना आ. पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे हेही उपस्थित होते. 

   पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की. आम्ही काढणार असलेली आहिल्याबाई होळकर यांची यात्रा ही दरवर्षी प्रथेप्रमाणे निघणार असून ग्रामस्थ, ग्रामपंचायत, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, भाविक भक्त व अध्यात्मिक लोक यांच्या समवेत मीही एक यात्रेकरू म्हणून यात सहभागी असेल. या यात्रेत उज्जेन येथून आणलेला गजराज (हत्ती) घोडे, वारकरी, टाळकरी यांचाही समावेश असणार आहे. सकाळी ७: ०० वाजता निघेल व मंदीरापर्यंत येईल. 

दि. ३१ मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या शासकीय कार्यक्रमास आमचा पाठिंबाच आहे. तसेच या कार्यक्रमासाठी लागणारी काही मदत करण्याचीही आमची तयारी आहे. तसेच या कार्यक्रमासाठी येत असलेले राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येण्यापूर्वीच आम्ही आमचे कार्यक्रम संपवणार आहोत. मात्र आम्ही घेत असलेल्या कार्यक्रमांना जरी प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी आम्ही १०० टक्के शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांच्या वतीने चालत आलेली यात्रा काढणार आहोत असा निर्धार यावेळी आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

दरम्यान पत्रकार परिषदेपुर्वी दि. ३१ मे रोजी जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाची पुर्व तयारी म्हणून येथील आहिल्याबाई होळकर सभागृहात कर्जत जामखेड तालुक्यातील येथील कार्यकर्ते व ग्रामस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी आ. रोहित पवार यांच्या समवेत आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात,  कैलास वराट, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, प्रसाद ढोकरीकर, माजी सभापती राजेंद्र गुंड, विकास राळेभात, वैजीनाथ पोले, सरपंच आसाराम गोपाळघरे, विजयसिंह गोलेकर, आरणगावचे माजी सरपंच संतोष निगुडे, शंकर गदादे, बाबासाहेब मगर, काकासाहेब कोल्हे, अंगद रूपनर, देवा खरात, विजय पावने, विजय देवकाते, श्रीमंत शेळके, तानाजी पिसे, संतोष म्हेत्रे, सुनील शेलार, भाऊसाहेब तोरडमल आदी मान्यवरांंसह कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here