जवळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे श्रेणीवर्धन करून प्रा.आरोग्य केंद्राची मंजुरी द्यावी 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील  जवळा हे मोठे गाव असुन .या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून ते पूर्णपणे पडलेले आहे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी आरोग्याच्या सोयी अपुऱ्या पडत आहेत . गावातील व परिसरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे श्रेणीवर्धन करून प्रशस्त  असे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे व हा प्रश्न मार्गी लावावा अशा मागणीचे निवेदन जवळा ग्रामस्थांच्या वतीने खासदार सुजय  विखे यांना देण्यात आले.

आपण याप्रश्नी लक्ष घालून महसूल मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री  राधाकृष्ण विखे  यांच्या मार्फत हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन खा.सुजय विखे यांनी जवळा ग्रामस्थांना शब्द दिला. यावेळी ज्योती क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन अजिनाथ हजारे , जवळा ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रा. सदस्य प्रशांत पाटील, ग्रा. पं.सदस्य व युवा नेते अशोक पठाडे, ग्रा.पं. सदस्य किसन सरोदे , मार्गदर्शक डॉ.दीपक वाळुंजकर, पत्रकार संतराम सुळ , वन अधिकारी प्रदीप शिंदे, प्रगतिशील शेतकरी राजेंद्र महाजन यांच्या सह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here