डॉ.तनपुरे कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची थकीत पगार मिळत नसल्याने आत्महत्या

0

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी
                डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडे पगार थकले.रोजगार मिळेना,कारखाना बंद असल्याने थकीत पगार मिळत नसल्याने व कुठेही रोजगार मिळत नसल्याने आर्थिक परिस्थितीला कंटाळुन डाँ.तनपुरे कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय शेलार यांनी तांभेरे येथे फाशी घेवून जीवन याञा संपवली आहे.
           डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखाना गेला काही वर्षा पासुन बंद अवस्थेत असुन कामगारांचे थकलेले पगार व इतर निधी मिळविण्यासाठी कामगार संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली. परंतू आश्वासना शिवाय आज कामगारांच्या पदरात काहीच पडले नाही.सेवानिवृत्त नंतर जिवन जगने मुश्किल झाल्याने याच कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार दत्ताञय शेलार (वय 65) आर्थिक विवेचंनातून शुक्रवारी दुपारी राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील स्वतःच्या शेतातील एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.सध्या ते राहुरी कारखाना येथिल कामगार वसाहती मध्ये राहत होते. 
             लोकसभा निवडणूकीत कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.परंतू माजी आ.शिवाजीराव कर्डीले यांनी कामगारांचा मेळावा घेवून निवडणूकी विरोधात कोणतीही प्रक्रीया करु नका.लवकरच कामगारांची देणी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.कामगार संघटनांनी विश्वास ठेवून निवडणूक प्रक्रीयात सहभागी झाले होते.आज माञ अनेक कामगारांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याने आर्थिक विवेचंनास सामोरे जावे लागत आहे.
              कारखान्याकडे थकलेले पगार मिळत नसल्याने कामगार आता नको ते पावले उचलण्यास लागले असल्याने कारखाना प्रशासकीय प्राधिकृत अधिकारी यांनी वेळीच दखल न घेतल्यास टोकाचे पाऊल उचलणाऱ्या कामगारांची संख्या वाढू शकते. राहुरी पोलिसांनी आकस्मत मृत्यू रजि.नोंद केली असुन पुढील राहुरीचे पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here