दिनविशेष / राशिभविष्य

0

शके १९४५, शोभननाम संवत्सर, सोमवार, दि. ५ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण द्वितीया, चंद्र- धनु राशीत, नक्षत्र- मूळ, सुर्योदय- सकाळी ६ वा. ०२ मि. , सुर्यास्त-   सायं. १९ वा. १३ मि. 

आज चंद्र धनु राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज गुरु – चंद्र त्रिकोणयोग व शनि – चंद्र लाभयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कर्क व मकर या राशींना प्रतिकूल आहे.

        दैनंदिन राशिभविष्य

मेष  : एखादी भाग्यकारक घटना घडणार आहे. गुरुजनांचे अपेक्षित मार्गदर्शन लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नातेवाईकांकडे असणारी कामे यशस्वी होतील.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता देणारी एखादी घटना संभवते. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवाद नकोत.

मिथुन : उत्साहाने कार्यरत राहणार आहात. उमेद वाढेल. प्रवासाचे योग येतील. आनंदी राहणार आहात. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. अनुकूलता लाभेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. विरोधकांवर व हितशत्रुंवर मात कराल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

सिंह : प्रियजन भेटणार आहेत. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कन्या : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत रहाल. आनंददायी घटना घडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे.

तुळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. अपेक्षित गाठीभेटी पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. नातेवाईक व भावंडं यांच्या गाठीभेटी पडतील. प्रवासास अनुकूलता लाभणार आहे.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे. आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूलता लाभेल. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रवास होतील.

धनु  : अनेकांशी सुसंवाद साधाल. आपली मते स्पष्टपणे मांडू शकाल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

मकर : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दानधर्म कराल. काहींचा मात्र मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. दैनंदिन कामात अडचणी येतील.

कुंभ : जुने मित्रमैत्रिणी व सहकारी भेटतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांबरोबर सुसंवाद राहील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल.

मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. प्रवासात अनुकूलता लाभेल. आनंदी राहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम असणार आहे. अधिकाराने वागाल.

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९  या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४GARGI JYOTISHAALAYA: गार्गी ज्योतिषालय, सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here