महाविजेती गौरी पगारेच्या विजयी मिरवणुकीत स्नेहलताताई कोल्हे यांची फुगडी

0

अलकाताई पगारे यांनी गौरीच्या रूपाने हिरा घडवला -स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव : ब्राह्मणगाव या छोट्याशा खेड्यातील गौरी अलका पगारे हिने प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत कठोर परिश्रम घेऊन आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ ‘Saregamapa Little Champs’ या रिअ‍ॅलिटी शोच्या २०२३ च्या पर्वाचे विजेतेपद पटकावून ब्राह्मणगाव व कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. गौरीचे हे यश निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. अलकाताई पगारे यांनी गौरीच्या रूपाने अनमोल हिरा घडवला असून, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून यश कसे मिळवावे याचा आदर्श गौरीने समाजाला घालून दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे Snehaltatai Kolhe’ यांनी केले.

झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस् २०२३’ sa re gamapaया स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महाविजेती ठरलेल्या कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी गौरी अलका पगारे हिचा बुधवारी (२९ नोव्हेंबर) ब्राह्मणगाव येथे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. 

सत्कार समारंभापूर्वी महाविजेती गौरी पगारे, तिची आई अलकाताई पगारे यांची पुष्पवृष्टी करत जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी फुगडी खेळून गौरी पगारेच्या यशाचा आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर, ब्राह्मणगावचे लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले, गौरीची आई अलकाताई पगारे, मामा रोहिदास पगारे, राहुल पगारे, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स २०२३’ स्पर्धेत उपविजेता ठरलेला नगर जिल्ह्यातील वांजोळपोई येथील जयेश खरे याचे आई-वडील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे, गौरी पगारे हिचे मार्गदर्शक शिक्षक वारुळे, विठ्ठलराव आसने, अशोकराव येवले, के. बी. साळवे, जगनराव आहेर, पोपटराव आसने, बाळासाहेब बनकर, उपसरपंच ज्ञानदेव जगधने, गौरीचे कुटुंबीय, नातेवाईक, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ब्राह्मणगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, आपल्या मुला-मुलींनी जीवनात खूप मोठे व्हावे, नाव कमवावे, असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. गौरी पगारे हिने ‘सारेगमप लिटिल चॅम्पस् २०२३’ स्पर्धा जिंकून आई अलकाताई पगारे यांचे स्वप्न साकार केले आहे. या स्पर्धेमध्ये कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावची गौरी पगारे हिने विजेतेपद तर राहुरी तालुक्यातील वांजोळपोई येथील जयेश खरे याने उपविजेतेपद पटकावले असून, हे दोघेही नगर जिल्ह्यातील असल्याने आपल्याला विशेष आनंद झाला आहे. गौरी पगारे ही कोपरगाव तालुक्याचे भूषण असून, तिचा आम्हा सर्वांना साथ अभिमान आहे. आज गौरीचा जाहीर सत्कार होत असून, हा आनंदाचा क्षण आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या कलागुणांना उत्तेजन देऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाही तर मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. 

लहानपणापासून गायनाची आवड असलेल्या गौरी पगारे हिला सुराची दैवी देणगी लाभली आहे. गौरीचा ‘सारेगमप लिटिल चॅम्पस् २०२३’ स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश होण्यापूर्वी ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून तिचा माझ्या हस्ते जाहीर सत्कार केला होता. त्यावेळी गौरी या स्पर्धेत नक्की विजयी होईल, अशी आपल्या सर्वांना खात्री होती. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी, गायिका वैशाली माडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत विजेतेपद पटकावून कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावले आहे. गरीब कुटुंबातील गौरी पगारे हिने खडतर परिस्थितीशी संघर्ष करत मिळवलेले हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here