शके १९४५, शोभननाम संवत्सर, गुरुवार, दि. २४ ऑगस्ट २०२३, निज श्रावण शुक्ल अष्टमी, चंद्र- वृश्चिक राशीत, नक्षत्र- विशाखा सकाळी ९ वा. ०४ मि. पर्यंत नंतर अनुराधा, सुर्योदय- सकाळी ६ वा. २३ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५९ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत रहाणार आहे. आजचा दिवस
दुपारी ३ नंतर चांगला दिवस आहे. आज रवी – चंद्र केंद्रयोग, चंद्र – मंगळ लाभयोग व शनी – चंद्र केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मेष, मिथुन व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य

मेष : मानसिक अस्वस्थता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास टाळावेत.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुम्ही आज विशेष आनंदी रहाणार आहात.
मिथुन : प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. आज आपणाला एखादा मनस्ताप संभवतो. मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क : कार्यमग्न रहाल. प्रवासाचे योग येतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभ होतील.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. विशेष उत्साहाने कार्यरत रहाणार आहात.
कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होतील.
तुळ : मनोबल उत्तम राहील. आर्थिक कामात सुयश लाभेल. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : आनंदी रहाणार आहात. अनेक कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.
धनु : महत्त्वाचे निर्णय नकोत. कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य जपावे.
मकर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक परिवर्तन होणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात सूयश लाभेल.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. नवी दिशा सापडेल. नवा मार्ग दिसेल. प्रवास सुखकर होतील.
आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४