राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एसआरपीएफ बटालियनचे कुसडगावमध्ये उत्साहात स्वागत

0

नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनीही अभियानात नोंदवला सक्रिय सहभाग; विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन व प्रात्यक्षिकाचे आयोजन

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे असलेल्या राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रात नागरिकांना बरोबर घेऊन विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. कुसडगावच्या दौंड येथे कार्यरत असलेल्या एसआरपीएफ बटालियनने पोलीस अधीक्षक दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कुसडगाव प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आणि जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून एस आर पी एफ च्या कामासंदर्भात आणि शस्त्रांसंदर्भात माहिती देऊन प्रात्यक्षिक दिले व वृक्षारोपणही केले. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी त्यांचा यथोचित सन्मान करून स्वागत केले. 

कुसडगाव व परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध अभिनव उपक्रम राबवले ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन राज्य राखीव पोलीस बल गटाबाबत जनजागृती आणि  माहिती, वृक्षारोपण, शाळकरी मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन यासोबतच शाळकरी मुलांना शस्त्र प्रदर्शन व  प्रात्यक्षिकही देण्यात आले आणि स्वच्छता मोहीम व रनिंगच्या विविध स्पर्धा देखील आयोजित केल्या आहेत. हे उपक्रम २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान राबवले जात आहेत. 

दरम्यान, अशा पद्धतीच्या अभिनव उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी देखील अशा पद्धतीच्या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत आपल्या जामखेड मतदारसंघात हा उपक्रम राबवत असताना लागणारी सर्वतोपरी मदत संबंधितांना केली तसेच याबाबत अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले. स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवला आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लावत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here