वरिष्ठ निवड श्रेणीतील ऑनलाईन अडथळे त्वरित सोडवा व प्रशिक्षणासाठी मुदतवाढ द्या : अध्यापकभारती 

0

येवला (प्रतिनिधी)

    महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे  महाराष्ट्र यांच्यावतीने शिक्षक-शिक्षेकत्तर कर्मचारी निवड श्रेणी संदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम १० जुलै पासून सुरू असून या प्रशिक्षणात  वेबसाईट सुव्यवस्थित चालत नसल्यामुळे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमालीचा त्रास होत असून ते त्रस्त झाले आहेत.सदर प्रशिक्षणासाठी देण्यात आलेली वेबसाईट ही प्रचंड अडथळे व व्यत्त्याने चालत असून पुन्हा पुन्हा त्या साईटवर जाऊन लॉगिन करावे लागते व लॉगिन केल्यानंतर सुद्धा वेबसाईट प्रचंड धिम्या गतीने चालते.यात भरपूर वेळ जात आहे.

       वेबसाईट पुन्हा लॉगिन करण्यासाठी ती सर्च ही लवकर होत नाही,सर्च झाली तरी सदर वरिष्ठ निवड श्रेणीसाठी सोडवाव्या लागणाऱ्या ऑनलाईन चाचणी परीक्षा सोडवताना प्रोग्रामबार दिसत नाही.

     ऑनलाईन चाचणी (टेस्ट) सोडवली तरी प्रोग्रॅम बार १००% होत नाही व त्यामुळे चाचणी पुन्हा-पुन्हा सोडवावी लागते.

 ह्या व अशा अनेक तांत्रिक अडचणी-अडथळे सदर वरिष्ठ निवड श्रेणी करता येत असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्वरित ह्याकडे लक्ष घालून ऑनलाइन चाचणी व लॉगिन कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्वरित सोडवाव्यात व सदर वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी मुदत २० सप्टेंबर पर्यंत वाढून मिळावी अशी मागणी आपणास विनंतीपूर्वक अध्यापकभारती च्या वतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांस निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती अध्यापकभारती चे संस्थापक शरद शेजवळ, अध्यक्ष प्रा.विनोद पानसरे,शैलेंद्र वाघ,प्रा.नुमान शेख,प्रा.के.एस.केवटे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here