विकसित भारत संकल्प  रथाचे सोनेवाडीत उस्फूर्त स्वागत

0

सोनेवाडी ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे केंद्र व राज्य सरकार अंतर्गत विकसित भारत संकल्प  या रथाचा शुभारंभ सरपंच शकुंतलाताई गुडघे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील महिला व ग्रामस्थांनी या रथाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरपंच शकुंतला गुडघे व उपसरपंच संजय गुडघे त्यांच्या हस्ते नारळ काढून संकल्प यात्रेचे स्वागत  व आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी सोनेवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष निरंजन गुडघे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष धर्मा जावळे, संकल्प यात्रा रथाचे प्रतिनिधी कार्तिक अडसूळ, निलेश पांडे,ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब जावळे, चिलू जावळे, केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे ,हेमराज जावळे, मनराज खरे ,भिवराज जावळे, भाऊसाहेब खरे ,पुंजाहरी आव्हाड ,दादासाहेब जावळे, मीनाताई खरात, बचत गटाचे अध्यक्ष जयश्री लांडगे, आशा सेविका फटांगरे, श्रीमती चव्हाण, श्रीमती गुडघे, श्रीमती सोनवणे, ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे आदी उपस्थित होते.

सोनवडी गावात बचत गट, आरोग्य विभागात व शैक्षणिक विभागात उल्लेखनीय काम केलेल्या केंद्रप्रमुख सोमनाथ हरी जावळे, आशा सेविका रोहिणी नंदकिशोर चव्हाण व बचत गटाच्या प्रतिनिधी जयश्री अनिल लांडगे यांचा सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे यांनी पीएम स्वनिधी, पंतप्रधान आवास योजना व स्वच्छ भारत अभियानातील लाभार्थ्यांना योजनेची माहिती दिली. लाभार्थ्यांनी सामूहिक शपथ यावेळी घेतली. मोदी सरकारच्या काळात केंद्र व राज्यात झालेल्या विकास कामांचा आढावा संकल्प भारत रथाचे प्रतिनिधी कार्तिक अडचूळ व निलेश पांडे यांनी ऑनलाइन स्क्रीन चालू करून उपस्थित ग्रामस्थांना व्हिडिओ चित्रफित द्वारे माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास दाभाडे यांनी केले तर आभार निरंजन गुडघे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here