“शासकीय योजनाची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी शासन आपल्या दारी : अजित निकत

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :

               “शासकीय योजनाची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी शासन आपल्या दारी अभियानांतर्गत नागरिकांचे अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि  जनकल्याणकारी योजना सर्वसामान्या पर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा” असे आवाहन देवळाली प्रवारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले.

       देवळालीप्रवरा येथे शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी निकत बोलत होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ  मुसमाडे, सत्यजित  कदम पाटील, सुनील कराळे, मच्छिंद्र पाटील कदम,प्रकाश संसारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांग योजना, जन्ममृत्यू प्रमाणपत्रे,रमाई आवास योजना, पी एम स्वनिधी योजना, फेरीवाले धोरण, महिला बचत गट साठी कर्ज प्रस्ताव व नवीन नळ कनेक्शन यासंदर्भात कृती कार्यक्रम राबविण्यात आला.मान्यवरांनी  शासन आपल्या दारी  अभियानास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे शेवटी प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले.

देवळालीप्रवराचे कामगार तलाठी दिपक साळवे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here