संजीवनी ज्यु. काॅलेजची इ. १२ वी काॅमर्समध्ये ईश्वरी व रितिकाने ९३. ५० तर सायन्समध्ये अफशिन ८९. ६७ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

0

सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा
कोपरगांवः पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेतलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल आज इंटरनेटवर जाहिर केला असुन यात संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या कु. ईश्वरी  सुधाकर कुंभकर्ण व रितिका सुभाष  मते या दोघींनीही  काॅमर्स शाखेत ९३. ५० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला तर सायन्स शाखेत  कु. अफशिन  रियाजोद्दीन शेख  हीने ८९. ६७ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. संजीवनी ज्युनिअर काॅलेजने सलग ८ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे, अशी  माहिती काॅलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.  
          पत्रकात पुढे म्हटले आहे की काॅमर्स विभागात कु. श्रुती  भिकाजी औताडे हिने ९२. ५० तर ओमकार मच्छिंद्रनाथ  जगताप  याने ९२. १७ टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा सपन्नतेचे दर्शन  घडवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.सायन्स विभागात सायली संजय कोर्डे हिने ८६. १७ टक्के तर सिध्दी संतोष  थोरात हिने ८४. ८३ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
काॅमर्स विभागात विविध विषयांत २९ विध्यार्थ्यानी १०० पैकी ९० ते १०० असे गुण मिळविले असुन सायन्स विभागात विविध विषयात ३१ विध्यार्थ्यांनी  शेकडा ९० ते १०० असे गुण मिळविले आहे.  
                  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे तसेच प्राचार्य डाॅ. आर. एस. शेंडगे  व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
फोटो- सायन्स व काॅमर्स विभागाचे पहिले तीन टाॅपर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here