साखर आयुक्त कुणाल खेमनर यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे वतीने सत्कार.

0

कोपरगांव :

           येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि., सहजानंदनगर या कारखान्याचे चेअरमन,विवेक कोल्हे साो. व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे वतीने (IAS) महाराष्ट्र राज्याचे नुतन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनर साो. यांना प्रत्यक्ष भेटून कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी त्यांचा सत्कार केला तसेच संचालक मंडळाच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. डॉ. कुणाल खेमनर हे २०१२ चे यु.पी.एस.सी. बॅचचे आय.ए.एस. ऑफीसर असून त्यांनी यापूर्वी कोल्हापूर व चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच साखर आयुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी पूणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून जवळपास ४ वर्षापासून काम पाहिलेले आहे.

             सदर सत्काराप्रसंगी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे साखर, आसवणी प्रकल्प, कंट्रीलिकर विभाग तसेच अॅसेटीक अॅसीड, अॅसेटीक अनहैड्राईड व इथाईल अॅसीटेट या प्लॅन्टची संपूर्ण माहिती दिली. तसेच स्व. शंकरराव कोल्हे साो. यांनी आजवर केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कामकाजाची त्यांना माहिती दिली.

          त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सलग २८ वर्षे या कारखान्याचे चेअरमन पदाची धुरा सांभाळल्याची माहिती दिली, तसेच बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील पहिला ज्युस टू इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित केला गेला. कोरोना काळात पॅरासिटॅमॉल प्रोडक्शन घेण्याच्या दृष्टीने सर्व लॅब व कमर्शियल ट्रायल पूर्ण करण्यात आल्या व आता डायबेटीक पेशंट साठी शुगर फ्री शुगरचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती दिली, तसेच केंद्रसरकारने इथेनॉल चाबतीत पुन्हा धोरण घेऊन एफ.आर.पी. देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच इथेनॉल प्रकल्प चालविण्यास मुभा द्यावी, तसेच बी- हेवी पासून कंट्रीलिकर उत्पादनास घातलेली बंदी साखर आयुक्त व आयुक्त (मळी व मद्यार्क) यांचे माध्यमातुन केंद्रशासन दरबारी तातडीने प्रयत्न करण्याची विनंती केली. 

          विद्यमान चेअरमन, विवेक कोल्हे साो. यांनी गेल्या दोन वर्षात चेअरमन पदाची धुरा स्विकारल्यापासून नवनवीन संकल्पना व प्रकल्प अस्तित्वात येत असल्याची माहिती त्यांना दिली. युवा चेअरमन यांच्या संकल्पनेतुन पेपरलेस ऑफीस, ई. आर. पी. इम्प्लिमेंटेशन, बायो-सी.एन.जी., एम.ई.ई. प्रकल्प, स्प्रे ड्रायर, बायो अॅसेटीक अॅसीड इत्यादी नवीन प्रकल्प लवकरच पुर्णत्वास येत असल्याची माहिती दिली. जवळपास अर्धा तास शुगर इंडस्ट्रीमधील व खाजगी कारखान्यांची कामकाजाची माहिती डॉ. खेमनर यांनी घेतली तसेच ऊस उत्पादन वाढ, खोडवा व्यवस्थापन व देशीमद्य विक्रीचा महसुल वाढविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर साधक बाधक चर्चा होऊन राज्यातील साखर उद्योगापुढील आव्हाने व त्यावरील उपाय याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. 

          एकुणच एक तरुण साखर आयुक्त म्हणून महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांकडून डॉ. कुणालजी खेमनर सो. यांच्याकडून धडाडीचे निर्णय व गतिमान प्रशासन होईल याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here