सेवाव्रती विठ्ठलराव मंगलारम स्मृती जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ विधिज्ञ ॲड. रामदासजी सब्बन व जेष्ठ लेखक मुकुंद शिंगाराम यांना जाहीर

0

माजी आमदार डॉ सुधीर तांबे व स्नेहालयचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते ७ मे ला होणार अहमदनगरमध्ये पुरस्काराचे वितरण

   नगर – मासिक पद्मशाली प्रेरणा व सेवाव्रती प्रतिष्ठान यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा मानाचा ‘सेवाव्रती स्व. विठ्ठलराव नारायण मंगलारम सर स्मृती जीवनगौरव पुरस्कार’ मूळचे सोलापूरचे व सध्या मुंबई हायकोर्टातील विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे माजी कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट डॉ रामदास सब्बन तसेच पुणे येथील जेष्ठ साहित्यीक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराज शिंगारम यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, पुस्तक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

              अहमदनगर जिल्ह्यासह राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पद्मशाली समाज भूषण, मासिक पद्मशाली प्रेरणाचे संवर्धक संपादक सेवाव्रती स्व. विठ्ठलराव नारायण मंगलारम सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित मासिक पद्मशाली प्रेरणा व सेवाव्रती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सेवाव्रती स्व. विठ्ठलराव नारायण मंगलारम सर स्मृती जीवनगौरव पुरस्कार २०२३ चे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या पुरस्काराचे मानकरी अहमदनगर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे माजी प्रमुख व आय एम एसच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉ वसंतराव दिकोंडा व अहमदनगर शहराच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक, जेष्ठ पत्रकार , लेखक भूषण देशमुख ठरले होते. येथील श्री मार्कंडेय संकुल, दातरंगे मळा, नेप्ती नाक्या जवळ येथे, येत्या रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता माजी आमदार डॉ सुधीरजी तांबे यांच्या शुभहस्ते व स्नेहालयचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी, नगर अर्बन बँकेत सेवा बाजवलेले जेष्ठ अर्थकर्मी अशोक कुरापटी यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे.

                 गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून विधी, न्याय सेवेच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करण्या बरोबरच महाराष्ट्र राज्याचे तात्कालिक राज्यपालांचे कायदेविषयक सल्लागार,  सोलापूर विद्यापीठाचे कुलगरू पदाचे उमेदवार राहिलेले, तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे कायद्येविषयक सल्लागार, मुंबई हायकोर्टाचे जेष्ठ विधिज्ञ डॉ रामदास सब्बन यांना त्यांच्या न्याय, विधी व समाजसेवेच्या क्षेत्रातील तर मराठी, हिंदी, इंग्रजीसह तेलगु भाषेतून ग्रंथ निर्मिती करणारे, मार्कंडेय महामुनींच्या चरित्राचे चरित्रकार, चार दशकां इतका काळ पोस्टात सेवा करून निवृत्त झालेले समाज सेवक मुकुंदराज शिंगारम याना त्यांच्या साहित्य व समाजसेवेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जात असल्याची माहिती सेवाव्रती प्रतिष्ठानचे   राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम व श्रीनिवास एल्लाराम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here