हॉस्पिटलच्या सेवा कार्यात जनसंपर्क अधिकार्‍याची भुमिका महत्वाची -धनंजय कणसे

0

नगर –    हॉस्पिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये त्या-त्या हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी अर्थात पीआरओ हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे सदर हॉस्पिटलचा सेवाकार्य जनसामान्य, खेडोपाडीपर्यंत पोहोच करण्याचे कार्य हे जनसंपर्क अधिकारी अहोरात्र करत असतात. त्यामुळेच जनसंपर्क अधिकारी यांनी संघटित होऊन आपल्या स्वतःबरोबर हॉस्पिटलचा आणि संघटनेच्या माध्यमातून विकास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन हेल्थकेअर मार्केटिंग असोशियन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष धनंजय कणसे यांनी केले.

     हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन अहमदनगरच्या नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण समारंभ या कार्यक्रमात  ते बोलत होते. कार्यक्रमास  राज्य सचिव मानसिंह चव्हाण, सदस्य श्रीकांत माने, सतीश भिसे, प्रकाश गाडे उपस्थितीत होते.

     ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील उमाप, किशोर पोखरणा, संदीप साळवे, इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 2024 व 2025 या सालासाठी नवीन पदाधिकारी पदग्रहण समारंभ पार पडला. नवनियुक्ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष – संपत पंडित, उपाध्यक्ष – महेश मोरे,सचिव – रंजीत घाडगे, सहसचिव- दत्ता दारकुंडे, खजिनदार – संतोष राहिंज, सहखजिनदार – डॉ.कैस रज्जाक शेख यांची नियुक्ती करण्यात आली. तर सोशल मीडिया कमिटी अध्यक्ष – सुरज काटकर, तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष – विल्सन वंजारे, शैक्षणिक कार्यक्रम कमिटी अध्यक्ष – सोपान सुंबे,  क्रीडा कमिटी अध्यक्ष – रोहन कुराटे,  सांस्कृतिक कार्यक्रम कमिटी अध्यक्ष – राजेश पंडित, आरोग्य कमिटी अध्यक्ष – सरफराज शेख, संचालक – आप्पा ढोबे, दत्ता चव्हाण, सौरभ वैरागर आदिंची निवड करण्यात आली.

     कार्यक्रमास हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष गौतम आढाव, माजी खजिनदार श्री.जवरे,  सुनिल भिसे, शैलेश सदावर्ते, प्रमोद आव्हाड, अतुल जोशी, मोहम्मद सय्यद, चांगदेव आंबेडकर, अमित धारक, राहुल घाडगे, संतोष शेळके, अक्षय साठे, स्वप्निल पंडित, जयसिंग दळवी, नवनाथ भानगुडे, महेश सातपुते,   आदिंसह सभासद व इतर आजी-माजी सर्व संचालक मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान सुंबे यांनी तर आभार रंजित घाडगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here