कलागुणांची जोपासना होण्यासाठी बाल संस्कार शिबिराची गरज – पवन नाईक

0

 नगर –  बाल संस्कार शिबिर म्हणजे संस्कार मूल्य अंगीकारून बालमनाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असून मुलांमध्ये कला-गुणांची जोपासना होण्यासाठी आज अशा शिबिरांची खूपच गरज आहे.  29 वे  वर्षे संस्कारमाला चालविली जात आहे, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या मुलांसाठी शिबीर किती आवश्यक आहे हे पालकांच्या लक्षात घेऊन आपल्या पाल्याच्या आवडी-निवडी पाहून जास्तीत जास्त आनंदी व समाधानी राहण्यासाठी आपण पालक म्हणून किती सहभाग देतो याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. जी संस्कार मूल्ये  शिबिर कालावधीमध्ये शिबिरार्थींनी आत्मसात केली आहे, त्याचे योग्य ते पालन करावे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक मा.पवन नाईक यांनी व्यक्त केले.

     रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दल अहमदनगर यांनी आयोजित बाल संस्कार शिबीराच्या समारोपप्रसंगी रावसाहेब पटवर्धन व साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी समितीच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे, सचिव अ‍ॅड. रवींद्र शितोळे, विश्वस्त सुहास अंतरकर, जगन्नाथ गुंड, दत्ता जंगम  व सेवा दलाचे बापू जोशी, पुरुषोत्तम जाधव,भीमराज कोडम व दत्ता देवगावकर आदि उपस्थित होते.

     संस्थेचे सचिव व संस्कारमालेचे संयोजक अ‍ॅड. रवींद्र शितोळे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात संस्थेच्यावतीने राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती सांगितली. माणुसकीचे दुत व शिबिर प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी शिबिर कालावधी मधील वृत्तांत सादर केला. दि. 14 एप्रिल ते 26 एप्रिल या शिबिर कालावधीत सर्वश्री डॉ.कल्पना ठुबे, दिपाली देऊतकर, विनायक सापा, डॉ.अमित सपकाळ, उबाळे साहेब, शेलार साहेब, दत्ता देवगावकर, हर्षद कटारिया, प्रिया ओगले-जोशी,  सुजाता वाऊत्रे-सब्बन, संस्थेच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे, अरुण आहेर, विवेक पवार, भीमराज कोडम, रमेश चिप्पा या मान्यवरांनी शिबिरार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here