क्लेम ..

0

मेडिक्लेम पाॅलिसीचे

वाढले चांगले  प्रस्थ

एक  बाजू  भक्कम 

रूग्ण झालेत स्वस्थ…

नवे विचीत्र  विषाणूं

करती नीत अस्वस्थ

नवीन तंत्रज्ञान आले

करी सकल आश्वस्त…

ईलाज तेवढेचं  रोग

विविधव्याधीने ग्रस्त

विमा संरक्षण घेऊन

आपणच घाल  गस्त…

फसवा  फसवी वाढे

कंपनी  निवडा रास्त

क्लेम  आहे  म्हणता

बीलही फुगते जास्त ….

जागरुक रहावे सदैव

भरावी वेळेवर किस्त

उघडी ठेऊनि  बुध्दी

कार्या असावी शिस्त…

नियमांच्याजंजाळात

सामान्य जनता त्रस्त

क्लेम  होता नामंजूर

बजेट होईलं उध्वस्त …

– हेमंत मुसरीफ पुणे

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here