ड्युटी ..

0

सरकारी  कर्मचारी 

करे इलेक्शन ड्युटी 

अटळ असे टाळणे

राबले आदेशापोटी…

लागेलं जिथे ड्युटी 

राबायचे पोटासाठी 

इमाने इतबारे कामे

करती उपाशी पोटी…

नकार देणे अशक्य 

कायदा पडेलं पाठी

अपूर्ण सोयीसुविधा

ते  धरले जाती वेठी…

वेळही  पुरता पुरेना

कामाची  व्यग्र दाटी

उन्हाळा अति असह्य 

करे नीत आडकाठी …

कामे करी पडेलं ती

नको कामाची खोटी

अत्यल्प अपुरा भत्ता

हातात ठेवी लखोटी…

मुश्कीले पार पाडतो

जबाबदारी ही  मोठी

धन्यवाद  शब्द कुणा

कधीही  न येई ओठी…

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here