प्रोजेक्ट ..

0

कुठला हवा प्रोजेक्ट

सोडायचे दिल्लीवरी

मिळवाया परवानगी 

करायची दिल्लीवारी…

पारडे होता  रे हलके

योजना जाई माघारी

दिसता  कुठे  सावज

टपून असतात  घारी…

उड्या मारती  माकडे

हुशार असतो  मदारी

दुसरी कडील सुसंधी

खेचतो आपले  दारी..

आपला रोख मामला

तुम्ही  चुकवा  उधारी

प्रवास असता  दूरचा

सांभाळू  खा शिदोरी…

पतंगा  वाटते  गम्मत

आपल्या हाती  दोरी

हळूचं  पळव प्रकल्प

सापडू नये  ती  चोरी…

विवादाचा  रे फायदा

घेतातसजग व्यापारी

कुणाचे  चूक  बरोबर

मोजत  राही  मापारी….

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here