सवय ..

0

बालपण रे दडपण

नाजूक कोवळे वय

अचानकलागू शके

चित्र विचीत्र  सवय….

पालकांसाठी मोठा 

काळजीचा  विषय 

लहानग्यालागलेली 

कशी घालवू  सवय…

वातावरण राहे तसे

ग्रासलेले भिती मय

काय करावा उपाय

भोवती  फिरे वलय…

डोळेझाक  का करी

उगाचं नको  हयगय

सवय बनेल स्वभाव

आज कराल जरगय…

लपवण्यासाठी चुका

मुले करती अभिनय

अंगात भिनेलं सवय

जसजसे जाई समय…

मोडावी अभद्र सवय

दणकट  करुन हृदय

प्रबोधन निरूपयोगी 

प्रसंगी व्हायचे निर्दय…

हेमंत मुसरीफ पुणे 

 9730306996..

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here