पाताळेश्वर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंती दिनी अभिवादन

0

सिन्नर : येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे यांच्या हस्ते करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या जयंती प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची उजळणी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर. व्ही. निकम यांनी करून आजही आपला समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून खूप दूर आहे. प्रगती साधायची असेल तर त्यांची विचारसरणी आपण सर्वजण अमलात आणू त्यांनी संविधानातून दिलेल्या विचारांची आपण खऱ्या अर्थाने हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.त्यांच्या पुस्तकरुपी ज्ञानातून आपण पुढे जाऊ या म्हणजे समाज विकसित होईल व प्रगतीची वाटचाल अवलंबिल असे सांगितले. श्रीमती सी. बी शिंदे यांनी त्यांच्या जीवनपटाचा जीवन चरित्र वाचूया व त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करू असे सांगितले

.बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र वाचून आपल्या जीवनात आपणही आवड निर्माण करू व आपले ज्ञान वृद्धिंगत करू जीवन ज्ञानी व समृद्ध बनवूया असे सांगितले याप्रसंगी दर्शन वारुंगसे श्रेयस वाघ कृष्णा गिरी साहिल गोसावी तनवी पाटोळे तनुजा सहाने आरती वाघमारे वैष्णवी रेवगडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. नुकतेच एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या दर्शन रामकृष्ण वारुगसे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक बी आर चव्हाण आर व्ही निकम एस एम कोटकर आर टी गिरी एम सी शिंगोटे एम एम शेख सविता देशमुख के डी गांगुर्डे एस डी पाटोळे आर एस ढोली आप्पा थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here