अजबच संगमनेरात चोरट्यांनी चोरली नादुरुस्त रिक्षा !

0

<p>संगमनेर : सध्या संगमनेरात काय घडेल सांगता येत नाही. या अगोदर शहरात नव्या कोऱ्या इम्पोर्टेड मोटारसायकल चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू होते. मात्र आता चोरट्यांनी चक्क नादुरुस्त रिक्षा चक्क पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरून चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.

       याबाबत संतोष भास्कर नवले (रा.तहसील कार्यालयासमोर संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांची जुनी नादुरुस्त बजाज कंपनीची रिक्षा एम एच १५ ए ४०१९ (किंमत तीस हजार रुपये) ही अज्ञात चोरट्याने गुरुवार दि.१५ सप्टेंबर सायंकाळी सहा ते शुक्रवार दि.१६ सप्टेंबर सकाळी सहा वाजेच्या दरम्यान चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ८०७/२०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदरची घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here