अजून 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येत नाही :- शंभूराज देसाई

0

सातारा : “राष्ट्रवादी काँग्रेस अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही”, असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेविना राहवत नाही, सत्तेविना ते राहू शकत नाही. सत्तेविना ते तळमळत आहे”, असं देसाई म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे हेही त्यांनी सांगितलं. ‘टीव्ही9 मराठी’ने ही बातमी दिली आहे.
नुकतेच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुढे आले पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“लोकशाही मार्गानेच सभापती यांची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत”, असं मंत्री देसाई यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here