अतिक्रमण काढू न दिल्याने ग्रामसेवकाने शासकीय कामात अडथळा या प्रकरणी केला गुन्हा दाखल

0

फलटण :                                                                                                                                                               30/09/2022 रोजी सकाळी अकराच्या सुमारास मौजे वाखारी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील जुनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या लगत असणाऱ्या खोलीतील अतिक्रमण काढण्यासाठी कर्मचारी गेले असता गावातील रामाभाऊ नाथा ढेकळे नवनाथ आप्पा ढेकळे व इतर सर्व राहणार वाखारी तालुका फलटण यांनी ग्रामसेवक प्रशांत नाथा रणपिसे वय 42 वर्षे राहणार श्रीमंत रामराजे कॉम्प्लेक्स मालोजी नगर फलटण यांना अतिक्रमण काढू दिले नाही याप्रकरणी ग्रामसेवकाने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 676/2022 भारतीय दंड विधान संहिता कलम 353, 34 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे यापुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही.अरगडे करीत आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींच्या अटकेची तजवीज ठेवली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here