अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून समिर पाटील यांची निर्दोष मुक्तता

0

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे ) : पनवेल येथील मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड  संतोष शिंदे  यांच्या न्यायालयाने समीर पाटील ( रा.चिर्ले,ता.उरण )यांची भा.द.कलम ३५३ च्या गुन्ह्यातून मंगळवार दि२०/९/२०२२ रोजी मुक्तता केली आहे.जेष्ठ वकील अँड प्रमोद ठाकूर व अँड किशोर पाटील यांनी जिल्हा सत्र न्यायालयात सेशन केस १३३/२०२१ अन्वये आरोपी तर्फे काम पाहिले.

   अँड किशोर ठाकूर यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि १९/८/ २०१९ च्या रात्रीच्या सुमारास उरण तालुक्यातील दास्तान फाटा ते दिघोडे येथील वेश्वी ( दादरपाडा) बस स्टॉप जवळील एम आय डी सीच्या पाईप लाईनला अज्ञात ट्रेलर वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती.या घटने संदर्भात चिर्ले गावातील रहिवासी समिर पाटील यांच्या विरोधात एम आय डी सीच्या पाईप लाईनचे नुकसान तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केला, म्हणून समिर पाटील यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात दि१९/८/२०१९ रोजी भा. दं वि कलम ३५३च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   पनवेल येथील मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड  संतोष शिंदे यांच्या समोर समिर पाटील यांच्या बाजूने सेशन केस १३३/२०२१ तर्फे जेष्ठ वकील अँड प्रमोद ठाकूर व अँड किशोर ठाकूर यांनी योग्य बाजू मांडली असता जिल्हा सत्र न्यायाधीशांनी सर्व हकीकत समजावून घेत समिर पाटील यांची सदर गुन्ह्यातून मंगळवार दि२०/९/२०२२ रोजी निर्दोष सुटका केली आहे. जेष्ठ वकील  प्रमोद ठाकूर यांनी आरोपीतर्फे बचावाचे काम पाहिले. तर ॲड.  किशोर ठाकूर व अँड हृदयनाथ म्हात्रे यांनी त्यांना साहाय्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here