अवाजवी घरपट्टी कमी होणारच -विजय वहाडणे

0
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरातील मालमत्ता धारकांना १९६५ चे कलम ११९ (१) (२) अन्वये कर (घरपट्टी) वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.पण काही मालमत्तांचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अनेकांना अतिशय मोठ्या प्रमाणात घरपट्टी आकारली गेली असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडून असंतोष निर्माण झालेला आहे.म्हणून भारतीय जनता पार्टी(वसंत स्मृती कार्यालय) च्या वतीने दोन वेळा विनायकराव गायकवाड ,सतिश शेठ कृष्णानी यांचे नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन देऊन अन्यायकारक घरपट्टी कमी करण्याची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता .
काल पुन्हा एकदा शिष्टमंडळाने प्रशासक मुख्याधिकारी-प्रशासक शांताराम गोसावी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी कर आकारणी करतांना अनेक त्रुटी राहिल्याने अवाजवी घरपट्टी आकारण्यात आल्याचे मान्य करून पुन्हा एकदा नव्याने पडताळणी करून सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्यात येतील असे आश्वासन दिल्याने मालमत्ता धारकांना दिलासा मिळालेला आहे.आता यानंतर नागरिकांनी जुन्याच दराने आलेले कर(घरपट्टी) वेळेवर भरणे गरजेचे आहे.३१ डिसेंबरच्या आत कर भरणा करावा अन्यथा नाहक शास्तीचा भुर्दंड पडू शकतो.
त्याचप्रमाणे नव्याने हद्दवाढ झालेल्या मालमत्तांवर अवाजवी कर आकारणी करू नये अशीही मागणी करण्यात आली.त्यावेळी गावठाण भागाप्रमाणेच कर आकारणी करण्याचे मान्य करण्यात आले असल्याने त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.त्याचप्रमाणे त्या भागातील नागरिकांकडून दाम दुपटीने पाणी पट्टी वसूल करू नये अशीही मागणी करण्यात आली.यानंतर कोपरगाव नगरपरिषदेकडे हरकती नोंदविल्या नाही तरी चालतील.कारण सर्वच प्रकरणात नव्याने कर आकारणी केली जाणार असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेत ठरलेले आहे.कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या योग्य प्रतिसादामुळे यावेळी सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here