अवैद्य व्यवसायाबाबत रिपब्लिकन सेनेचे जावलीच्या तहसीलदारांना निवेदन

0

जावली तालुक प्रतिनिधी : जावली तालुक्यात वाढते अवैध व्यवसायाला चाप  बसणे खूप गरजेचे आहे जावली तालुक्यातील अवैध धंदे यामध्ये कमालीची वाढ झाली आहे दारू मटका गुटका इ.धंधे बंद न झाल्यास तालुक्यातील बेरोजगार तरुण व्यसनाधीन होऊन आराजकतेच्या मार्गावर जाईल व त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल याला वेळीच आळा बसणे काळाची गरज आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या टोळक्याविरोधात गंभीर कारवाई करून प्रशासनाचा वचक बसवावा असे न झाल्यास सात दिवसात त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेना तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दिला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण अडसूळ सातारा तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here