सातारा : राजकीय,सामाजिक, धार्मिक आदी क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी भानुदास सावंत करीत आहेत. सर्वसमाजात लौकिक निर्माण करून अष्टपैलू कामगिरी करून जनमाणसात आदराचे स्थान निर्माण केले आहे.त्यामुळे निरंतर सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडून येईल.नक्कीच सावंतसाहेब सज्ज असतील.असे गौरवोद्गार बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर काढले.
तारळे विभागातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे भानूदास सावंत यांनी बंधुत्व समाज – धम्मरत्न पुरस्कार नुकताच जगदीश गवई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.तेव्हा त्यांचा जाधववाडी येथे बाजीराव न्यायणीत यांच्या हस्ते विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला.तेव्हा वीर समारोपप्रसंगी मार्गदशन करीत होते.
यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली.मुख्याध्यापक सुनील माने यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास गौतम माने,राहुल रोकडे,मधुकर जगधनी,किशोर धरपडे,रामचंद्र गायकवाड,राजू सावंत,विजय भंडारे(बांबवडे), मधुकर भिसे,धनाजी कांबळे, आनंदा भंडारे,आप्पासाहेब भंडारे,राजदीप कांबळे, ओमकार सावंत,व्ही. जयवंत,भीमराव सप्रेआदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : बंधुत्व समाज धम्मरत्न पुरस्कार विजेते भानुदास सावंत यांचा सत्कार करताना बाजीराव न्यायणीत शेजारी मान्यवर.