आजपासून सायगावातही  खवय्यांसाठी मेजवानी

0

 सातारा/अनिल वीर : गावकरी हॉटेलनंतर गारवा बिर्याणीने धुमाकाळ साताऱ्यात घातला होता.तद्नंतर कराड व शुक्रवार दि.२८ रोजी सायंकाळी ५ वा. हॉटेल मातोश्री,सायगाव, ता. जावली येथे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीची तोफ शशिकांत शिंदे पाटणची १०० टक्के चविष्ट गॅरंटी देणारी बिर्याणी दाखल होत आहे.अशी माहिती बंधुत्व पाटणरत्न नितीन पिसाळ यांनी दिली.

             सी गोल्ड रेस्टॉरंट नितीन पिसाळ यांनी पाटणमध्ये सुरू करून बिर्याणीची चव खवय्यांना  दिली.शिवाय,जत्रा थाळीनेही भुरळ घातलेली आहेच.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केलेले आहे. नव्या खाद्य संस्कृती पर्वाची मेजवणी दीपक पवार,सुहास गिरी,सौ.जयश्रीताई गिरी,ऋषिकांत शिंदे,अमित कदम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होणार आहे. बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थांची मांदियाळी आहे.फक्त रु.९९/- मध्ये बिर्याणी मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रथम ३ दिवस बिर्याणीवर पुलाव फ्री मिळणार आहे.याचीही नोंद ग्राहकांनी घ्यावी. असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here