सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे नूतन कार्यकारिणी पुनर्रचना कारण्यासंर्भात रविवार दि.१६ रोजी दुपारी १२.३० वा. महाविहार,कराड येथे महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड यांनी दिली.
जिल्हा विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. नूतन कार्यकारिणी नियुक्ती करण्यासाठी संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे यांच्या आदेशान्वये व जिल्ह्याचे अध्यक्ष व्ही. आर. थोरवडे यांच्या सूचनेनुसार महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय निरीक्षण कमीटी म्हणून एस. के. भंडारे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी), ऍड.एस. एस. वानखेडे (राष्ट्रीय सचिव),रुपेश तामगावकर (सदस्य,केंद्रीय ऑडीट कमिटी) व भिकाजी कांबळे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) हे पदाधिकारी जिल्हा नूतन कार्यकारिणीची पुनर्रचना करणार आहेत. तरी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा, तालुका, शहर, ग्रामशाखा तसेच केंद्रीय शिक्षक-शिक्षिका बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, आजी-माजी पदाधिकारी, समता सैनिक दल यांनी वेळेवर उपस्थित रहावे.कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपली तक्रार तीन प्रतीत संबंधितास,निरीक्षक यांना व जिल्हा शाखेस द्यावी. असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.