सातारा : जिल्ह्यात विविध संघटनांच्या माध्यमातून धम्मचक्रप्रवर्तन दिन व वर्षावास सांगता समारोहाचे आयोजन रविवार दि.९ रोजी करण्यात आले आहे.अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.
माता रमाई,बौद्ध विकास मंडळ, अष्टशील प्रतिष्ठान,बंधुत्व प्रतिष्ठान व तत्सम मंडळातर्फे त्रिपुडी,ता. पाटण येथे सकाळी ९ वा. धम्मचक्रप्रवर्तन दिनाचा सांगता समारोह अष्टशील विहारात आयोजीत करण्यात आला आहे. याकामी वीर,शिंदे परिवार व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अथक असे परिश्रम घेत आहेत.
भारतीय बौद्ध महासभा व तारळे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावरघर,ता.पाटण येथे सकाळी १० वाजता वर्षावास सांगता कार्यक्रमास अनेक मान्यवरांमध्ये बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती भानुदास सावंत यांनी दिली आहे. याशिवाय, तारळे येथील दीक्षाभूमी येथे सायंकाळी ७ वा. वर्षावास सांगता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील समता समाज संघ यांच्यावतीने, “जाती तोडो,समाज जोडो” या अभियानांतर्गत व कांशिराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी १०।। वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी “धम्मचक्रप्रवर्तन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर समता समाज संघाचे प्रदेश महासचिव सुरेश तुर्भे व अध्यक्ष विलास गरुड मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थान धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे भूषावणार आहेत.बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रा.रमेश मस्के स्वागत करणार असून धम्मबांधव उत्सव कमिटीचे संस्थापक अनिल वीर सांगता करणार आहेत.अशी माहिती आयोजक डॉ.गोरख बनसोडे यांनी दिली आहे.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.