आज जिल्ह्यात धम्मचकरप्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

सातारा : भारतीय बौद्ध महासभा व तत्सम विवीध संघटनेच्यावतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी धम्मक्रप्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवार दि.५ रोजी सकाळी ९.३० वा. महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन करण्यात येणार आहे. तदनंतर धम्म ध्वजारोहन व सामूहीक धम्म वंदना व सुत्र पठण होणार आहे. १० वा. महामानव यांच्या प्रतिमांची मिरवणूक शहरांतून श्रामणेर संघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. उपासक – उपासीका यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ११.३० वा.छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवनूकीची सांगता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here