सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कार सन १९९१ पासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना अतुलनीय कार्य केल्याबद्धल दिले जातात. तेव्हा सोमवार दि.१० रोजी सातारा येथील सुरभी मंगल कार्यालयात व्ही.आर.थोरवडे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारप्रसंगी अनोखी अशी भेट बंधुत्व प्रतिष्ठानने जाहीर केली आहे.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे यांना बंधुत्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार – नाथा ममता आगाणे (काका), केंद्रीय शिक्षक भागवत भोसले, यशवंत अडसुळे (आप्पा) व दिलीप फणसे यांना जाहीर झाला असून बंधुत्व धम्म प्रचार-प्रसार पुरस्कार जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड व जिल्हा उपाध्यक्ष अरविंद उत्तम बारसिंग यांना तर बंधुत्व समाज – धम्मरत्न पुरस्कार तारळे महासभेचे विभागाध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक भानुदास सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती संस्थापक अनिल वीर यांनी दिली.