आज महाविहारमध्ये बौद्धाचार्य परीक्षांचे आयोजन

0

सातारा/अनिल वीर :  केंद्र व राज्य शाखेच्या आदेशानुसार जिल्हा शाखेच्यावतीने रविवार दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी बौद्धाचार्य  परीक्षेचे आयोजन केले आहे. तेव्हा संस्थेच्या सर्व माजी श्रामणेर यांनी जिल्हा महाविहार (कराड) येथे मूळ श्रामणेर प्रमाणपत्र, शैक्षणिक पुरावा व परीक्षा फीसह शुभ्र वस्त्रात परीक्षेसाठी उपस्थित रहावे.लेखी परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २, सहभोजन २ ते ३:०० व  प्रात्यक्षिक परीक्षा सायंकाळी ४ ते ५ या वेळेत होणार आहे.     

      केंद्रीय शिक्षक प्रवेश परीक्षा सीईटीसाठी श्रामणेर प्रमाणपत्र ( मूळ),बौद्धाचार्य प्रमाणपत्र (मूळ),शैक्षणिक पात्रता, ज़िल्हा अध्यक्ष यांची शिफारस लागेल. तेव्हा अधिक माहितीसाठी वरिष्ठांशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here