आता गॅस सिलेंडर रिफिल घेण्यापूर्वी बुकिंग करणे आवश्यक : कोपरगाव गॅस कंपनी

0

कोपरगाव : कोपरगाव गॅस कंपनीच्या सर्व घरगुती गॅस ग्राहकांना आता गॅस सिलेंडर रिफिल घेण्यापूर्वी बुकिंग करणे आवश्यक असणार आहे . त्याकरिता प्रत्येक घरगुती ग्राहकाने गॅस सिलिंडर खरेदी करण्या अगोदर बुकिंग करण्याचे आवाहन कोपरगाव गॅस कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या पत्रकात कंपनीच्या वतीने म्हटले आहे की गॅस सिलेंडर रिफिलसाठी आगाऊ बुकिंग केली तरच आपली ऑनलाईन गॅस सिलेंडर डिलीव्हरीची नोंद होऊन आपणास हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पो. लि. तसेच केंद्र सरकारने लागू केलेल्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल.
गॅस सिलेंडर बुकिंग साठी ८८८८८२३४५६ या क्रमांकाला कॉल करून कोपरगांव गॅस कंपनीचा ८ अंकी वितरक कोड १९५२५९०० अथवा विना एस टी डी कोड लँड लाईन क्रमांक २२२५२५ हा टाकावा नंतर खात्री झाल्यानंतर आपला ६ अंकी ग्राहक क्रमांक टाकून खात्री करावी व १ अंक टाकून बुकिंगची खात्री करावी. बुकिंग झाल्यानंतर आपला बुकिंग क्रमांक सांगितला जाईल त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक वाचून सांगतील त्यानंतर मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यासाठी १ अंक टाकायला सांगतील. १ अंक टाकून मोबाईल रजिस्टर करावा.
गॅस सिलेंडर नोंदणीसाठी आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून ९४९३६०२२२२ या क्रमांकाला मिस कॉल करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क कोपरगांव गॅस कंपनी येवला नाका, कोपरगांव.
संपर्क क्रमांक — ०२४२३-२२२५२५ ९३२५९९२५२५ / ९९६०७८४०४८ ९०७५१०१०३९ / ९५११७७८७७७ वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here