आनंदाचा शिधा त्वरित वाटपाचे नियोजन करा

0

  आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

कोळपेवाडी वार्ताहर :- दीपावली सणानिमित्त १०० रुपयांमध्ये शासनाने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र दिवाळीचा सण उद्यावर आला असतांना अजूनही कोपरगाव तालुक्यात हा आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे तातडीने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटपाचे नियोजन करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत.

उद्या दीपावली सण आहे राज्य शासनाने १०० रुपयात रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे मात्र हा आनंदाचा शिधा अजूनही कोपरगाव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. आनंदाचा शिधा कधी मिळणार याची कोपरगाव तालुक्यातील शिधापत्रिकाधारक वाट पाहत आहे. उद्या दीपावली सण असल्याने हा शिधा मिळणार कधी, तो तयार कधी करायचा याची याची शिधापत्रिकाधारकांना चिंता पडली आहे.

 त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना दीपावली सणाला गोडधोड पदार्थ तयार करण्यासाठी हा आनंदाचा शिधा लवकरात लवकर त्यांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे असून शिधापत्रिकाधारक आनंदाचा शिधा कधी मिळणार या प्रतीक्षेत आहेत. याची काळजी घेवून कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा त्वरित वितरित करण्यासाठी योग्य नियोजन करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here