आनंदाचा शिधा योजनेने सर्व सामन्यांची दिवाळी गोड मुर्शतपूर येथे वितरण

0

कोपरगाव (वार्ताहर) दि. २९

            महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी सर्व सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला त्यात गोर गरीब जनतेला माफक दरात साखर रवा डाळ व तेल उपलब्ध झाले. त्याचे वितरण कोपरगावच्या प्रथम महिला आमदार तसेच भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैया कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली मुर्शतपुर येथे करण्यात आले. कोल्हे कुटुंबीय नेहमी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात आनंदाचा शिधा प्रत्येक गावात वेळेत पोहचून लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला मुर्शतपूर गावात एकूण ५४७ लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत आणि तेवढे शिधा किटही उपलब्ध झाले आहेत. सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आपला शिधा घेऊन जावा असे आवाहनही उपस्थितांनी केले या प्रसंगी संचालक अप्पासाहेब दवंगे ,भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रकाश दवंगे, रामभाऊ शिंदे, मधुकर उगले, साहेबराव शिंदे,संदीप गुरुळे अन्वरभाई शेख,रंगनाथ उगले,सुधाकर शिंदे,दिलीप शिंदे संदीप उगले,नाना शिंदे यांचे सह स्थानिक कार्यकर्ते,लाभार्थी उपस्थित होते यावेळी अनेक लाभार्थ्यांनी महाराष्ट्र सरकार, व माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांना धन्यवाद दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here