*’आनंदाचा शिधा’ वाटपास जिल्ह्यात राहाता मधून सुरूवात*

0

*राहाता तालुक्यासाठी ५० हजार ३९ कीट प्राप्त*

*शिर्डी, दि.२० ऑक्टोबर : -* सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी; म्हणून शासनाने जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’चे ५० हजार ३९ किट राहाता तालुक्यात पोहचले आहेत. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शिधावाटपास ‘राहाता’ पासून सुरुवात करण्यात आली आहे.

राहाता मधील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून तहसीलदार कुंदन हिरे यांच्याहस्ते ‘आनंदाचा शिधा किट’ वाटपास आज सुरुवात झाली. यावेळी पुरवठा निरीक्षक भारत खरात, गोदामाला रिझवान शेख तसेच लाभार्थी उपस्थित होते. 

‘आनंदाच्या शिधा’ कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक  किलो साखर, रवा, चणाडाळ व एक लीटर पामतेल वाटप केले जाणार आहे. राहाता तालुक्यात ५० हजार ३९ कीट प्राप्त झाले असून पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गरिबांना आनंदाचा शिधा उद्यापर्यंत वाटप केला जाणार आहे‌. अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

शासनाने दिवाळीपूर्वी ‘आनंदाचा शिधा’ दिल्यामुळे आमची दिवाळी गोड झाली आहे‌. अशा भावना शिधा मिळालेले अरुण पवार, सुमन आरणे, बाळासाहेब बोरावके, शशी सोमवंशी, आशीष राहिंज, संगीता बर्डे, कांता माळी, सुनीता देव्हारे, संगीता मालपुरे, युनुस शाह, संजय रंधवे या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here