आनंदाची किराणा किटचे सावरचोळ,मेंगाळवाडीत वितरण 

0

संगमनेर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली व संकल्पनेतून सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाची दिवाळी किराणा किट सावरचोळ, मेंगाळवाडी याठिकाणी पोहोचली त्यानंतर स्वस्त धान्य दुकाना मार्फत लाभार्थी सर्व ३८८ कार्ड धारकांना तिचे वाटप करण्यास सुरवात करण्यात आली.

     एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर, एक लिटर गोडेतेल पिशवी अशा वस्तू या आनंदाच्या किटमध्ये आहे. लाभार्थ्यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतिषराव कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या किटचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आलेे. यावेळी सावरचोळ सोसायटीचे चेअरमन शरद कानवडे, सावरचोळच्या सरपंच अनिताताई कानवडेे, सोसायटीचे व्हाचेअरमन दत्तू  कानवडे, पोलीस पाटील संजय कानवडे, माजी सरपंच भोरू भूतांबरे, सेल्समन अण्णासाहेब कानवडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सागर कानवडे, भाजपा नेते संपत कानवडे, माजी व्हाचेअरमन अशोक कानवडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कानवडे, लक्ष्मण धावजी कातोरेे, किसन हेमा कातोरेे, राजाराम कुशाबा कातोर ,गंगाराम गांडाळ, संपत गांडळ, दशरथ गांडाळ, सोमनाथ कानवडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here