आय लव्ह खोपटे चमकते फ्रेमचे भावना म्हात्रे यांच्या हस्ते अनावरण

0

उरण दि. 23 (विठ्ठल ममताबादे )ग्रुप ग्रामपंचायत खोपटेच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांच्या सौजन्याने खोपटे गावाचे आय लव्ह खोपटे नावाची चमकती फ्रेम खोपटे गावात दत्त मंदिर समोर लावण्यात आली . सदर केलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा खोपटेच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांच्या शुभहस्ते रविवार दि 23/10/2022 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाविषयी आदर असतो, प्रेम असतो. आपुलकी असते. गावाविषयी प्रत्येकाला अभिमान वाटावा, गावा विषयी अधिक प्रेम निर्माण व्हावे. गावात एकी राहावी, राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे, शांतता प्रस्थापित व्हावी या अनुषंगाने सदर चमकत्या फ्रेम ची संकल्पना मला सुचली व ते मी प्रत्यक्ष सत्यात उतरविले असे उदघाटन प्रसंगी भावना म्हात्रे यांनी सांगितले.यावेळी काँग्रेस उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,शिवसेना उरण तालुका संघटक बी.एन डाकी, उद्योगपती कैलास म्हात्रे, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष कमलाकर म्हात्रे , चेअरमन राजन पाटील, सभापती महेंद्र पाटील,डाॅ. संजीव म्हात्रे, युवराज पाटील,सदस्या जागृती घरत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ खोपटेचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here