आश्वी खुर्द सेवा सहकारी सोसायटी झाली १११ वर्षाची

0

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे स्वातंत्र्य पुर्व काळात म्हणजे २२ सप्टेंबर १९११ साली तत्कालीन बडोदा संस्थानचे अधिकारी कै. त्रबंकराव माधवराव होनमोडे यानी अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पहिली सेवा सहकारी सोसायटी स्थापन केली. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी व ग्रामविकासाच्या अर्थिक भरभराटीस सुरवात झाली.  या सेवा सोसायटीला पंचक्रोशीतील शेतकऱ्याची अर्थिक जननी म्हटले जाते. संस्थेच्या दैदीप्यमान वाटचालीत कै. त्रबंकराव माधवराव होनमोडे, सरदार शिवराव प्रतापराव थोरात, गंगाधर मांढरे गुरुजी, आण्णासाहेब भोसले यांच्यासह त्या-त्या कालखंडात लाभलेल्या चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकाचे संस्थेच्या जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.१९११ सालापासून गावपातळीवर शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी सर्वात मोठी संस्था म्हणून या विविध कार्यकारी सोसायटीने आपली ओळख जपली आहे. सुरवातीच्या काळात तब्बल ५० ते ६० वर्ष पानोडी ते निमगावजाळी या ग्रामीण पट्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने ही सोसायटी शेतकऱ्यांचा मुख्य आधार होती. या सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना माफक दरात पीक कर्ज, सुधारित खते, बी-बियाणे, शेतीची अवजारे यासाठी सोसायटी कर्जपुरवठा करत आली आहे. तसेच मालतारणावर आगाऊ रक्कम देणे. दुभती जनावरे खरेदी करणे व त्याना खाद्य पुरवठा करणे यामध्ये संस्थेने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात या विविध कार्यकारी सोसायटीचे मोलाचे योगदान असल्याचे सभासद शेतकऱ्यानी सांगितले. तसेच सोसायटीच्या माध्यमातून पूर्वी कापड दुकान, स्वस्त धान्य दुकान, मंगल कार्यालयासाठी लागणारे स्वंयपाकाचे साहित्य आदिसह विविध समाजहिताचे उपक्रम चालवले जात होते. परंतू काळानरुप त्यामध्ये खंड पडला आहे.

शेतकऱ्याचा माल साठवण्यासाठी संस्थेकडे धान्य भंडार व ग्राहक भंडार अशी दोन गोदामे आहेत. सस्थेने एडीडीसी बँक व अश्विनी पंतसंस्थेला आपली जागा भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिली आहे.

या सेवा सोसायटीने सतत ऑडीट वर्ग ’अ’ मिळवला असून आता संस्थेचे ५०७ सभासद असून सभासदाच्या ठेवी ५१८३९९५ रुपये आहे. राखीव निधी २२२५१३५ रुपये, इतर निधी५५५४९३ रुपये, गुतंवणुक ४३२५९७८ रुपये तसेच संस्थेला ६३२२३२ रुपये नफा झाला आहे. या सर्व व्यवहारातून सोसायटीच्या दैदिप्यमान वाटचालीची प्रचिती येते.

कै. त्रिंबकराव माधवराव होनमोडे यांनी १९११ साली संस्था स्थापन झाल्यापासून १९३१ पर्यत संस्थेचे चेअरमन पद साभाळले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मारुतीबाप्पा गायकवाड यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण झाले. कै. त्रबंकराव माधवराव होनमोडे, कै. धोडूं विनायकराव पाटील, कै. गणपत मनाजी वाल्हेकर, कै. मारुतीराव लक्ष्मणराव गायकवाड, कै. आबासाहेब शंकर सोनवणे, कै. गंगाधर सखाराम मांढरे, कै. भिमाजी कुशाबा भोसले, कै. कुंडलिक धोडींबा गायकवाड, कै. गजानन तुकाराम खर्डे, कै. विठ्ठल गबाजी सोनवणे, कै. कँप्टन विजयराव गुणे, कै. संभाजी पांडुरंग सोनवणे, निवृत्ती शंकर गायकवाड, तसेचं बाळासाहेब गंगाधर मांढरे, हनुमंता पाटीलबा गायकवाड, जेष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदंस्य आण्णासाहेब तथा सावळेराम गबाजी भोसले यांनी आपल्या चेअरमन काळात संस्था भरभराटीला आणत संस्थेचा लौकीक वाढवण्यात मोलाचे योगादान दिले.दरम्यान सेवा सोसायटीत सध्या चेअरमन विठ्ठलराव गायकवाड, व्हा. चेअरमन भाऊसाहेब शिदें, संचालक रमेश सोनवणे, विजय भोसले, राजेद्रं मांढरे, प्रशांत कोडोंलीकर, ज्ञानेश्वर खर्डे, स्नेहलकुमार भवर, दत्तात्रय गायकवाड, भास्कंर वाल्हेकर, संचालिका सौ. सुरेखा प्रकाश गायकवाड, सौ. शोभाताई बाळासाहेब गायकवाड, संचालक राजेंद्र अन्तवन मुन्तोडे व स्विकृत संचालक विठ्ठल वर्पे तसेच सचिव बाबासाहेब गायकवाड, क्लार्क आप्पासाहेब गायकवाड, भास्कंर बर्डे हे संस्थेचे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here