आ.आशुतोष काळेंकडून नारी शक्तीचा सन्मान

0

देर्डे चांदवड सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.मनिषा कोल्हे, व्हा.चेअरमनपदी सौ.सुनिता कोल्हे

कोळपेवाडी वार्ताहर – मागील वर्षी कोपरगाव मतदार संघातील देर्डे चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने कोल्हे गटाकडून सत्ता हिसकावून घेत सर्वच्या सर्व १२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची पाठराखण करीत त्यांनी सोसायटीच्या चेअरमनपदी मागासवर्गीय समाजाला न्याय देवून सोसायटीच्या चेअरमन पदी विराजमान केले होते तर व्हा.चेअरमन पदावर देखील अल्पसंख्याक समाजाला संधी दिली होती. आता त्यापुढे जावून एक आगळा वेगळा निर्णय घेवून देर्डे चांदवड सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमनपदी महिलांना संधी देवून त्यांच्या हाती सोसायटीच्या कारभाराची जबाबदारी देवून नारी शक्तीचा सन्मान केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन विष्णूपंत रंगनाथ विघे व व्हा चेअरमन सचिन शांताराम मेहेत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन, तर व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक अधिकारी आय. आय. शेख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी चेअरमन पदासाठी सौ.मनीषा सुभाष कोल्हे यांच्या नावाची सूचना दादासाहेब शुक्लेश्वर शितोळे यांनी मांडली. सदर सूचनेला ज्ञानदेव होन यांनी अनुमोदन दिले. व्हा चेअरमन पदासाठी सौ. सुनिता संजय कोल्हे यांच्या नावाची सूचना शिवाजी होन यांनी मांडली.त्या सूचनेला बबनराव कोल्हे यांनी अनुमोदन दिले. चेअरमन, व्हा चेअरमनपदासाठी अनुक्रमे सौ.मनीषा कोल्हे व सौ. सुनिता कोल्हे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी आय.आय. शेख यांनी चेअरमनपदी सौ.मनीषा कोल्हे व व्हा चेअरमनपदी सौ. सुनिता कोल्हे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक कामी सोसायटीचे सचिव हेमंत मोकळ यांनी सहकार्य केले. सर्व सदस्यांनी नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन केले  

यावेळी संचालक शिवाजीराव होन, संजय शितोळे, प्रभाकर कोल्हे, बबनराव कोल्हे, ज्ञानदेव होन, अशोक होन, भाऊसाहेब होन, सचिन मेहेत्रे, भाऊसाहेब होन, भाऊसाहेब कोल्हे, सतिष गुंड, चांगदेव होन, पोपटराव गुंड, सुभाष कोल्ह प्रितम मेहेत्रे, तुकाराम होन, जयवंतराव होन, बाळासाहेब सोनवणे व ग्रामस्थ  उपस्थित होते. आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

चौकट :- आ.आशुतोष काळे यांनी महिलांना सहकारी संस्थेच्या कारभारात व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेवून प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करतांना देर्डे चांदवड सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमनपदी नारी शक्तीला संधी दिली आहे. आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या संधीचे सोने करून आम्ही सक्षमपणे सोसायटीचा कारभार चालवू व सर्व सहकारी सदस्यांना विश्वासात घेवून संस्थेची प्रगती साधणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित चेअरमन सौ. मनीषा कोल्हे व व्हा.चेअरमन सौ. सुनिता कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here