आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून करंजी-कोळगाव थडीचा

0

मुस्लीम दफनभूमीचा प्रश्न मार्गी

कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासूनचाप्रलंबित असलेलाकोपरगाव तालुक्यातील करंजी व कोळगाव थडी येथे मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला असून या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

कोपरगाव तालुक्यातील करंजी व कोळगाव थडी येथे मुस्लिम दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मुस्लीम बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचून मुस्लिम दफनभूमीसाठी जागा मिळावी अशी मागणी केली होती. मुस्लीम बांधवांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून आ. आशुतोष काळे यांनी करंजी व कोळगाव थडी येथे मुस्लिम दफनभूमीसाठी जागा मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून या दोनही गावांना मुस्लिम दफनभूमीसाठी जागा मंजूर करून करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच  आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करंजी व कोळगाव थडी ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले. अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडवून मुस्लीम कब्रस्थानसाठी जागा मिळवून दिल्याबद्दल करंजी व कोळगाव थडी येथील मुस्लिम बांधव व ग्रामस्थांच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे यावेळी आभार मानले.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, कारभारी आगवण, सांडूभाई पठाण, मानेखा पठाण, फिरोज पठाण, रज्जाक पठाण, मुख्तार शेख, अकिल शेख, बालम पटेल, मुस्ताक पटेल, अश्पाक इनामदार, जावेदभाई पठाण, तसेच कोळगाव थडी येथील उपसरपंच सुनील चव्हाण, सोमनाथ चव्हाण, कैलास लूटे, नंदकिशोर निंबाळकर, दिनकर वाकचौरे, हुसेन शेख, कलंदर सय्यद, महंमद शेख, मौलाना हसन पठाण, अन्वर सय्यद आदी उपस्थित होते.

फोटो ओळ– करंजी व कोळगाव थडी येथील ग्रामस्थांना मुस्लिम दफनभूमीसाठी जागा मंजूरीचे आदेश सुपूर्द करतांना आ. आशुतोष काळे समवेत तहसीलदार विजय बोरुडे आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here