आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात विविध योजनांची ३४४ प्रकरणे मंजूर

0

संगमनेर : काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेतेे तथा राज्याचे माजी मंत्री  आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने तालुक्यात विकासकामांचा वेग कायम असून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना योग्य लाभार्थींना मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा होत आहे. संगमनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १९२ प्रकरणांपैकी १५६ प्रकरणे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे १४७ पैकी १३१ प्रकरणे, श्रावणबाळ योजनेअंतर्गत १६३ पैकी ५७ अशी एकूण ३४४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
           संगमनेरतचे तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही प्रकरणे नुकतीच मंजूर करण्यात आली. तर उर्वरीत १५८ प्रकरणांत किरकोळ त्रुटी आढळल्या असून या त्रुटी सुधारुन ही प्रकरणे पुन्हा तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. सततच्या  विकास कामामुळे संगमनेर तालुका हा राज्यासाठी आदर्शवत व विकासाचे मॉडेल ठरला आहे. पायाभूत सुविधांसह शैक्षणिक सुविधा, आर्थिक समृद्धी, सुरक्षित व शांततेचे वातावरण यांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ योग्य लाभार्थी पर्यंत मिळवून देण्यासाठी काम होत आहे.इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यशोधनचे जनसेवक व कार्यालय काम करत आहे. यामुळे तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना याचा लाभ मिळत असून या योजनेसाठी जे लाभार्थी योग्य आहेत त्यांनी आपले अर्ज यशोधन कार्यालयातील जनसेवक किंवा सेतू कार्यालयात जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here