आ. बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे तालुक्यात पाण्याची समृद्धी – इंद्रजीत थोरात

0

संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री, आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सिमेंट बंधाऱ्यांचे जाळे निर्माण झाल्याने तालुक्यात पाण्याची समृद्धी निर्माण झाली आहे असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले. 

         तालुक्यातील अंभोरे धरणाचे व मालुंज येथील बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन संतोष हासे , उपसभापती नवनाथ अरगडे , शॅम्प्रोचे व्हा. चेअरमन सुभाष सांगळे , रावसाहेब खेमनर , लहानु खेमनर ,  सहादू खेमनर , किसनराव खेमनर , बबनराव खेमनर, भाऊसाहेब वाघमोडे , वाल्मीक  खेमनर,  भागवत जगनर , हौशिराम वाघमोडे , तुळशिराम मलगुंडे , भागवत खेमनर , कोडांजी वाघमोडे , बाबूराव खेमनर , बी. एस. खेमनर , भाऊसाहेब खेमनर , शरद खेमनर, तर मालुंजे येथे संतोष नागरे, निवृत्ती घुगे, संजय खरात, गणेश डोंगरे, तात्याबा डोंगरे, संपत सोसे, सुंदर खेमनर,  गोरक्षनाथ खेमनर, ग्रामविकास अधिकारी जेजुरकर आणि आंभोरे व मालुंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी वस्तीवरील नद्या, ओढ़े, नाले यांच्यावर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले आहे आणि यामुळे पाणी ठिकठिकाणी अडवले जात आहे. यामुळे तालुक्यात पाण्याची समृद्धी वाढली आहे. याचबरोबर तालुक्याला वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले असून कालव्याची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसात निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात दिसेल तो तालुक्याचा सुवर्ण दिवस असेल असेही ते म्हणाले.दूध संघाचे चेअरमन  रणजीतसिंह देशमुख म्हणाले की अंभोरे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने या धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी हे मालुंजे धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्येही समाधान निर्माण झाले आहे. पाणी हीच खरी संपत्ती असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ म्हणाले की आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने कायम शेतकऱ्यांना मदत केली आहे.यावेळी अंभोरे, डिग्रर,स मालुंजे, शेडगाव या परिसरातील ग्रांमस्थ  व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here