उरण दि 19(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघ व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरातील वाणी आळी येथील तेरापंथी सभागृहात इमारतींचा पुनर्विकास संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला .यावेळी महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. ऍड श्रीप्रसाद परब यांनी इमारतींचा पुनर्विकास संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी रीडेवलपमेंट संदर्भात कायदेशीर बाबी सांगितल्या. रीडेवलपमेंट म्हणजे काय त्यासाठी काय तरतुदी आहेत. आर्किटेक्टची नेमणूक,पीएमसी ची नेमणूक आदी बाबी विषयी मार्गदर्शन केले.सभासद यांनी जागरुक राहून सतर्कता दाखवून संपूर्ण प्रोसेस पूर्ण करावी असे सांगत यावेळी त्यांनी सेल्फ रिडेवलपमेंट विषयी माहिती दिली.तसेच त्यांनी सभासद यांनी विचारलेल्या कनव्हेन्स डीम कन्व्हेन्स ,नॉमिनेशन फॉर्म आदी प्रश्नाबाबत समर्पक उत्तरे दिली.यावेळी सहायक निबंधक राजेंद्र गायकवाड व नवी मुंबई हौसिंग फेडरेशनचे सचिव भास्कर म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन महासंघाचे संचालक दामोदर केणी तर सुत्र संचालन सचिव वाघ यांनी केले.यावेळी संचालक महेंद्र कुडतरकर, धनाजी पाटील, जगदीश पाटील, सभासद संस्था व उरण मधील गृहनिर्माण संस्था मधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, पौष कृष्ण दशमी, शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५, चंद्र - वृश्चिक राशीत, नक्षत्र - अनुराधा, सुर्योदय- सकाळी ०७ वा....
महाबळेश्वर : पर्यटनस्थळाबरोबरच 'स्ट्रॉबेरी लॅण्ड' अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे.रासबेरीचा दर १ हजार २००...
कराड : सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्यानजीक वडोली निळेश्वर हे सुमारे २५०० लोकसंख्येचे गाव आहे. येथील बाळासाहेब श्रीरंग पवार यांची प्रगतिशील शेतकरी...