पैठण,दिं.४ :ईसारवाडी ता.पैठण येथील गावात नवरात्रोत्सव निमित्ताने पिंपळवाडी पिराची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहीम अंतर्गत नवरात्र निमित्त महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. सदरील शिबिरात आरोग्य तपासणी सह गरोदर मातांची तपासणी या मध्ये हिमोग्लोबिन , ऊच्च रक्त दाब,शुगर(साखर) सह इतर आजारांवर या बाबत तपासणी करण्यात आली तसेच वृद्धांची मोती बिंदू,रक्तातील व लगवितील साखर,उच्च रक्तदाब, क्षयरोग, दमा,कातडीचे आजार ,हिमोग्लोबिन सह इत्यादी आजार बाबत तपासणी करण्यात आली.
सदरील आरोग्य शिबिराची तपासणी डॉ.श्रध्दा काटकर, आरोग्य पर्यवेक्षक सुभाष थोरात,आरोग्य सेवक चंद्रकांत मगरे,प्रयोग शाळा तंत्रज्ञ तुषार झेंडे यांनी केली सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी आशा सेविका यांनी पुढाकार घेतला.
———
फोटो : पैठण : ईसारवाडी येथे नवरात्रोत्सव निमित्ताने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)